शरद पवार यांना सोडण्याचा दिलीप वळसे पाटील यांनी केला खुलासा !
शहर प्रतिनिधी:-आंबेगाव
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत शरद पवार यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे आणि सध्या अजित पवार यांच्यासोबत असणारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बऱ्याचजणांना आतल्या गोष्टी माहित नसल्याचेही त्यांनी म्हटले,
आंबेगावमधील कळंब येथे बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं,
पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत नसतात असे त्यांनी म्हटले. वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली आणि त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं, दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री असल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला आणि आपली कामे झाली. राजकरणात अशा गोष्टी कधी कधी घडतात. एकदा आपण पुलोद स्थापन केला, एकदा काँगेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली.
